दिवसेंदिवस अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून आज नव्याने चार रुग्ण अहमदनगर जिल्ह्यात सापडले आहेत.

यात श्रीगोंदा तालुक्यातील अवघ्या दहा महिन्यांच्या बाळाला कोरोना व्हायरस ची लागण झाली आहे.श्रीगोंदा फॅक्टरी येथे दुसरा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. पहिल्या रुग्णाच्या घरातीलच 10 महिन्यांचे बाळाला कोरोना झाला आहे.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी माहिती दिली. कालच्या तपासणीत सगळे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी हा दहा महिन्यांच्या मुलाची पुन्हा तपासणी केल्यावर तो कोरोनाग्रस्त असल्याचे लक्षात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here