आज अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येने  शतक पार केले आहे, आज जिल्ह्यात ०४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या 103 झाली आहे.

आज नव्याने सापडलेल्या रुग्णांत घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले वडील आणि मुलगी कोरोना बाधित असून इतर दोन नेवासा आणि श्रीगोंदा येथील रुग्ण आहेत. 

दरम्यान आज जिल्ह्यातील ०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना आज डिस्चार्ज मिळाला आहे.

पाथर्डी आणि संगमनेर येथील प्रत्येकी ०१ तर सारसनगर येथील ०२ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून आतापर्यंत एकूण ५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here