ठाणे : covid-19 रुग्णांना quarantine करण्याकरिता ठाणे शहरातील मंगल कार्यालय तसेच हॉल ताब्यात घेण्यात यावेत यासाठी मनसेचे ओवळा – माजीवाडा विधानसभा विभाग सचिव सौरभ नाईक यांनी एक पत्र मा. आयुक्तांना दिले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ठाणे शहरामध्ये covid-19 च्या पुर्ण वाढ होत आहे रुग्णांना विलगीकरण करण्याकरिता या जागा आहेत त्या कमी पडत आहेत तेव्हा अशा रुग्णांना विलगीकरण करण्याकरिता ठाणे शहरामध्ये असलेले मंगल कार्यालय तसेच काही हॉल ठाणे महानगरपालिकेने ताब्यात घ्यावे व त्या ठिकाणी विलगीकरण कक्ष तयार करावा या यामुळे ठाणे महानगरपालिकेचा पैसा देखील वाचेल व या रुग्णांची गैरसोय टाळली जाईल. तसेच ही मंगल कार्यालय आहेत त्याठिकाणी येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या आदेशानुसार पुढच्या काही दिवसात कोणत्याही प्रकारचे कोणते प्रकारचे कार्यक्रम होणार नाहीत तेव्हा त्याठिकाणी इतर गोष्टींचा देखील त्रास लोकांना होऊ शकत नाही असे लक्षात आणून देऊन आयुक्तांनी या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा असे नाईक यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here