अहमदनगर: नगरमध्ये आढळलेल्या एका करोना बाधित महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. येथील जिल्हा रुग्णालयात या महिलेचे सिझरियन करण्यात आले. या महिलेने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला. दोन्ही बाळांची आणि मातेची प्रकृती व्यवस्थित असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

मुंबई येथून एक गर्भवती महिला निंबळक (ता. नगर) येथे आली होती. या महिलेची २५ मे ला करोना अनुषंगाने तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी तिचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. आज या महिलेने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला.

दोन्ही बाळांचे वजन २ किलो इतके आहे. दरम्यान, या दोन्ही मुलांची सुद्धा करोना अनुषंगाने तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी ही माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here