अहमदनगर :-  आज जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्याने उच्चांक गाठला आहे. एकाच दिवसात तब्बल 13 जण पॉझिटिव्ह, तर दोन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले ०१, ठाणे येथून पारनेर हिवरे कोरडा येथे आलेला १, चाकण (पुणे) येथून ढोर जळगाव शेवगाव येथे आलेला १, संगमनेर २, निमगाव (राहाता) ४.
निमगाव येथील ०४ व्यक्ती यापूर्वीच्या बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील. बाधीत रुग्णात वडील आणि मुलगी यांचा समावेश आहे.

संगमनेर येथील ४० वर्षीय महिला रुग्णाला आजाराची लक्षणे जाणवत असल्याने ग्रामीण रुग्णालय संगमनेरने पाठवले होते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. दुसरा ५५ वर्षीय पुरुषाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने खाजगी रुग्णालयाने पाठवले होते जिल्हा रुग्णालययात. तेथे याचा अहवाल पॉझिटिव्ह. त्याचा आज दुपारी मृत्यू झाला.

घाटकोपर येथून पिंपळगाव खांड येथे आलेली महिला यापूर्वीच्या बाधीत रुग्णाच्या संपर्कातील आहेत. चाकण येथून ढोरजळगाव येथे आलेला ३० वर्षीय युवक बाधीत आहे.

सायंकाळी प्राप्त अहवालात ०४ व्यक्ती बाधीत आढळून आल्या. राशीन (कर्जत) येथील ५३ वर्षीय व्यक्ती बाधीत आहे. पुण्यास नोकरीला असणाऱ्या पत्नीस भेटून आला होता गावी परत आला होता.

घाटकोपरहून टाकळीमिया (राहुरी) येथे आलेल्या १७ वर्षीय मुलीला लागण झाली आहे. यापूर्वी बाधित आढळून आलेल्या महिलेची नातेवाईक आहे.

निमगाव (राहता) येथील बाधीत महिलेचा २० वर्षीय नातवाला कोरोनाची बाधा झाली आहे. सायन (मुंबई) येथून केलुगण (ता. अकोले) येथे आलेल्या ४० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण. सायन रुग्णालयात ड्रेसर म्हणून काम करत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here