देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे जून महिन्यातही कोरोनाचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊन 5.0 साठी नवी गाईडलाईन जाहीर केली आहे.

ग्रीन, रेड, ऑरेंज झोन रद्द करुन केवळ कंटेन्मेंट झोन असणार आहे. चित्रपटगृह, स्विमिंग पूल, जिम, आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद राहणार आहे. दुकानांमध्ये केवळ 5 लोक एकावेळी खरेदी करु शकतात. अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 लोक उपस्थित राहू शकतात, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतात. यासाठी पासची आवश्यकता नसणार आहे.

8 जूननंतर कंन्टेमेट झोनशिवाय इतर ठिकाणी सर्व मंदिर, मॉल, शॉप्स खुले होतील. राज्य सरकारने स्थानिक परिस्थिती विचार लक्षात घेत शाळा कॉलेज याचा विचार करावा अथवा पुन्हा जून अखेर आढावा घेऊन जुलै महिन्यात सुरू करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

लॉकडाऊन 5.0 चे महत्त्वपूर्ण मुद्दे

-8 जून रोजी रेस्टॉरंट शॉपिंग मॉल. उघडण्याची परवानगी

-आंतरराज्य मोव्हमेंट वरील निर्बंध हटविण्यात आला आहे.

-स्थानिक उड्डाण आणि मेट्रोच्या आंतरराष्ट्रीय कामकाजाचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल

-हा लॉक डाऊन टप्पा 30 जूनपर्यंत सुरू राहणार आहे

-जुलै महिन्यातील परिस्थितीनुसार स्कूल सिनेमा हॉलचा निर्णय घेण्यात येईल

– रात्री 9 ते सकाळी 5  या वेळेत लोकांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात येणार आहे.

लॉकडाऊन 5.0 ता कालावधी 1 जून ते 30 जून असा असेल. कंटेनमेंट झोनमधील फेजनुसार सूट दिली जाणार आहे.

फेज 1 मध्ये…

8 जूनपासून पूजास्थळे उघडली जातील, हॉटेल, रेस्टॉरंट उघडले जाईल, शॉपिंग मॉल्स उघडली जातील.

फेस 2 मध्ये ….

जुलैमध्ये सर्व संबंधित पक्षांशी शाळा महाविद्यालये उघडण्यासाठी इत्यादींशी बोलण्याचा निर्णय घेण्यात येईल.

फेस 3 ……

स्थितीचे मूल्यांकन आणि निर्णय घेण्यात येईल, आंतरराष्ट्रीय उड्डाण, मेट्रो, सिनेमा हॉल, जिम, थिएटर, बार, सामाजिक, राजकीय, खेळ, धार्मिक कार्यक्रम आदी.

रात्री कर्फ्यू …..

रात्री 9 ते सकाळी 5  या वेळेत सार्वजनिक वाहतुकीवर पूर्ण बंदी असेल.

असा टप्प्याटप्यानं वाढत गेला लॉकडाऊन…

पहिला लॉकडाऊन – 25 मार्च ते 14 एप्रिल

दुसरा लॉकडाऊन – 15 एप्रिल ते 3 मे

तिसरा लॉकडाऊन – 4 मे ते 17 मे

चौथा लॉकडाऊन – 18 मे ते 31 मे

पाचवा लॉकडाऊन – 1 जून ते 30 जून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here