कोरोना संसर्ग असल्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आलेला होता यात सर्व व्यापार व्यवसाय छोटे-मोठे उद्योगधंदे हे बंद पडले होते अशा परिस्थितीमध्ये लोकांचा हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली होती अशा परिस्थितीमध्ये विविध फायनान्स कंपनी कडून व बचत गट पतसंस्था व इतर बँकांकडून व्यवसायासाठी कर्ज घेतलेले कर्जाची रक्कम सध्या तरी लोकांना कडे नाही याची जाणीव ठेवून केंद्र व राज्य सरकारला याची जाणीव झाल्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी गेल्या काही दिवसापूर्वी घोषणा केली होती की लॉकडाउन काळामध्ये कोणीही कर्जाचे हप्ते भरून नाही परंतु शासनाच्या या नियमाची पायमल्ली करत काही फायनान्स कंपनी यांनी वसुलीचा धडाका चालू ठेवला अशाच आशयाचे निवेदन काही दिवसापूर्वी श्रीरामपूर शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले होते परंतु त्यावर काही ठोस निर्णय घेण्यात आलेला नव्हता त्यामुळे या फायनान्स कंपनी कंपनीला कुठेतरी वचक बसला पाहिजे व आज झालेली घटना ही पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी मनसेच्या वतीने पुन्हा निवेदन देण्यात आले बाबासाहेब शिंदे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की फायनान्स कंपनीच्या या त्रासाला कंटाळून गोंधवणी येथील राहणाऱ्या संतोष घनशाम पालकर याला चे आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे त्या फायनान्स कंपनी तसेच कर्मचाऱ्यांवर त्वरित गुन्हा दाखल करावा अन्यथा या लॉकडाऊन काळ संपल्यानंतर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनावर राहील असे निवेदनात म्हटले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here