श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील गोंधवणीरोड पाटाच्या पुलाखालील साचलेल्या घाण पाण्यामध्ये काही महाभागांनी आठ दिवसांपूर्वी रात्री अंधाराचा फायदा घेत मेलेली जनावरे (कुत्रे – शेळ्या,मेंढी) टाकल्याने ते पाण्यात पूर्णत: सडून परीसरात दुर्गंधी पसरली आहे,
या प्रकरणी संबंधितांकडे आठ दिवसांपासून तक्रार करत असताना अद्याप कोणीही दखल घेत नसल्याने परीसरातील नागरीकांना या दुर्गधीचा त्रास सहन करावा लागत आहे,
तरी मा.नगराध्यक्षा मॅडम,व मुख्याधिकारी साहेब यांनी याप्रकरणी लक्ष घालून जनतेचा त्रास दूर करावा अशी मागणी होत आहे,
पहिलेच कोरोनाच्या संकटाने नागरीकांच्या नाकी नऊ आणले असता त्यावर सदरील दुर्गंधीपासून साथीच्या आजाराचा फैलाव होऊ नये अशी भीती नागरीकांच्या मनात निर्माण होत आहे, मात्र तरी देखील श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनातील संबंधित विभागाचे अधिकारी/कर्मचार्यांत अशा गंभीरबाबी कमालीची उदासिनता दिसून येत असल्याने नागरीकांना मोठ्या आवघड समस्यांचा सामना करणे भाग पडत आहे,
तरी श्रीरामपूर नगर पालिकेच्या लोकनियुक्त आणि लोकप्रिय नगराध्यक्षा मा.अनुराधाताई आदिक आणि मुख्याधिकारी समीर शेख यांनी याप्रकरणी स्वत: लक्ष घालून परीसरातील नागरीकांना या दुर्गंधीपासून मुक्ती देत त्यांचा त्रास दूर करावा अशी परीसरातील त्रस्त नागरीकांकडून मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here