श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण येथील भाविकांचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान ते श्री क्षेत्र पंढरपूर सालाबाद प्रमाणे यावर्षी आषाढी एकादशी निमित्त जाणाऱ्या पायी दिंडी सोहळा स्थगित झाल्याची माहिती अडबंगनाथ संस्थान चे महंत स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी संस्थान येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत दिली
सदगुरु नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संस्थानचे मठाधिपती अरुणनाथगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा साजरा करण्याची परंपरा असून दिंडी सोहळ्याचे हे बारावे वर्ष असून एक शिस्तप्रिय पायी दिंडी सोहळा म्हणून श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान दिंडी नावारूपास येत आहे परंतु यंदा देशात व राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे त्यामुळे या व्हायरसचा भाविकांना व वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून शासनाच्या नियमाचे पालन करून या वर्षाची पायी दिंडी सोहळा आपण स्थगित करत आहोत तर गेल्या अनेक महिन्यांपासून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व त्यांचे मंत्रिमंडळ प्रतिनिधी यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहे याकामी डॉक्टर, पोलिस खाते, महसूल खाते, पत्रकार, मीडिया तसेच विविध सेवाभावी संस्थेचे सहकार्य लाभत असून त्यांचे या बैठकीत अडबंगनाथ संस्थांकडून आभार मानण्यात आले
या भूमीत अडबंगनाथांची बारा वर्ष तपसाधना केली असल्याने आषाढी एकादशीनिमित्त संस्थान येथे साध्या पद्धतीने पालखी सोहळा साजरा करण्यात येणार असल्याचे माहिती संस्थानचे मठाधिपती स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here