*ममदपूरचा कर्मचारी बाधित..!!*
राहाता दि.३१ प्रतिनीधी- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्ग रुग्णांची संख्या वाढत चालली असून रविवारी दिवसभरात दहा नविन रुग्णांची संख्या वाढली आहे. यात राहाता तालुक्यातील ममदापुर येथील ३५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. संबधीत बाधित युवक हा शिर्डीला साईबाबा संस्थान मधे सेवेत असून निमगाव येथील बाधित महिलेच्या मुलाचा चांगला मित्र आहे. दोघे ही सोबत काम करत असल्याची माहीती समोर येत असून संबधीत भाजी विक्रेता महिलेला भेटण्यासाठी हा युवक गेल्याची माहित मिळत आहे.
राहाता तालुका पुर्णपणे कोरोना मुक्त झाल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. मात्र मागील चार पाच दिवसात तालुक्यातील निमगाव येथील भाजी विक्रेता महिला कोरोना बाधित आढळून आल्याने प्रशासनाची झोप उडाली होती. प्रशासनाने खबरदारी म्हणून निमगाव कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर कर चौदा दिवस संपुर्ण गाव बंद केले. त्यानंतर संबधीत महिलेच्या संपर्कातील जवळपास ४५ व्यक्तींची तपासणी करत त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. यातील पहिल्या दिवशी पाच दुस-या दिवशी एक आणि आज पुन्हा एक असे रुग्ण आढळून आले आहेत. आता जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४१ झाली असून तालुक्यात शिर्डीत एक, निमगावं मधे सहा आणि आता ममदापुर येथे एक असे एकुण आठ रुग्ण आहेत.
जिल्ह्यात १० कोरोना बाधित रुग्णांची भर; एकुण १४१ कोरोना बाधित संख्या
आज कोरोना बाधित निष्पण झालेला व्यक्ती हा साईबाबा संस्थान मधे कार्यरत असल्याने खबरदारी म्हमून संस्थान प्रशासनला आधिक काळजी घेण महत्वाचे आहे. मंदिर बंद असल्याने अनेक कर्मचा-यांना सुटी आहे. अशा हे कर्मचारी कोठे गेले, कोणत्या नातेवाईकांकडे जावून आले, कोणत्या मित्रांच्या सोबत होते याची चाचपणी करणे महत्वाचे आहे.
आपल्या आजूबाजूला कोणी कोरोना संशयित आढल्यास त्वरीत प्रशासनाशी संपर्क साधा. प्रशासनाला माहिती दिल्यास संबधित व्यक्तीवर उपचार होवून तो बरा होवू शकतो तसेच कोरोना संसर्ग पसरण्यास थांबू शकतो. तेव्हा असा कोणी संशियत आढळून आला किंवा त्या प्रकारची लक्षणे आढळली तर प्रशासनाला माहित द्या असे अवाहन राहाता तहसिलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.