प्रतिनिधी: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक स्तरावर कोरोना संक्रमण रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे, त्यात फवारणी, बाहेरून आलेले लोकांना विलगिकरन कक्षात ठेवणे अश्या पद्धतीने आपल्या परीने विविध उपाय योजना आखल्या जात आहेत.पण काही गाव खेड्यात या उलट प्रकार दिसत आहे तो म्हणजे असा की महांकाळ वाडगाव येथील सरपंच यांनी कोरांन्टाईन केलेल्या लोकांना अतिशय खालच्या दर्जाची वागणूक देत आहे अशी तक्रार थेट उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना समक्ष भेटून मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी केली
बाबासाहेब शिंदे यांनी पत्रात असे सांगितले आहे की गावांमधील धनदांडगे व विशिष्ट असे अनेक लोक जिल्ह्यातील सीमा दररोज ओलांडून गावांमध्ये येत असतात परंतु त्यांना होम क़्वारांटाइन केले जात नाही परंतु गरीब लोकांना जाणीवपूर्वक क्वारांटाइन केले जाते व त्या क्वारांटाइन केलेला लोकांना कुठल्याही सुविधा मिळत नाहीत तसेच काल रात्री पाचच्या सुमारास एक दांपत्य क्वारांटाइन झाले होते त्यांना पिण्यासाठी पाणी सुद्धा दिले नाही सरपंचाकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले उद्या सकाळी अकरा वाजता पाणी भेटेल या दांपत्याला बरोबर एक चिमुकली पाण्यासाठी रडत बसली होती अशा निष्पाप जीवाशी खेळण्यापेक्षा त्यांना क्वारांटाइन न करता कोरोना होऊन त्यांचा अंत झाला ते बरे असे तेथील नागरिकांमधून बोलले जात आहेत तरी माननीय उपविभागीय अधिकारी साहेबांनी चौकशी करून कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती़
आम्ही गावचे सरपंच याच्याशी जाब विचारण्यास गेलो असता ते सरपंच आम्हास मी राजीनामा देईल अशी धमकी देतात व गावाचे काहीही घेणेदेणे नाही अशा भाषेत बोलतात.यामुळे आम्ही कोणाला बोलावे असा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला आहे.असे म्हणाले आहे,आणि आपण या सर्व प्रकरणाची चौकशी करावी आणि ग्रामस्थांना न्याय मिळवून दयावा ही नम्र विनंती अशा वेळ काढून नेणाऱ्या व आपल्या कामात कुचराई करणाऱ्या सरपंचा विरोधात योग्य ती कारवाई करावी नाहीतर मनसेच्यावतीने पुढील आंदोलन करण्यात येईल त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनावर राहील याची आपण नोंद घ्यावी