अहमदनगर :- कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे हे कर्जतच्या तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

त्यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सोशल डिस्टन्स ठेवून उपोषणाला बसले आहेत.

आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते.

जून महिना आला तरी कुकडीतून पाणी सोडण्यासाठी नियोजन झाले नसल्याने प्रा.राम शिंदे यांनी उपोषण सुरू केले आहे.

उन्हाळा संपत आला आहे तरी पाणी नाही. उन्हाळात पाणी मिळणे गरजेचे होते. पाणी असुनही पाणी सोडण्याबाबत नियोजन झाले नाही.

प्रशासनाकडून कसलाही संपर्क झालेला नसल्याने मी नियोजनाप्रमाणे उपोषण करणार असल्याचे प्रा. शिंदे यांनी कालच स्पष्ट केले होते.

सोशल डिस्टन्ससह इतर शासकीय नियमांचे पालन करून प्रा. राम शिंदे व पदाधिकाऱ्यांचे उपोषण सुरु आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here