अहमदनगर :-  कुकडी आवर्तन पाणी वाटप नियोजनात असमन्वय आणि आभाव असल्याचे परिणाम तालुक्यातील शेतकरी भोगत असून उन्हाळी आवर्तन हे पावसाळ्यात सोडत आहेत. पाणी सोडण्याबाबत लोकप्रतिनिधी ६ तारीख सांगत आहे आणि अधिकारी १० तारीख सांगून जनतेची दिशाभूल करीत आहे, असे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी कर्जत तालुका भाजपच्या वतीने सोमवारी उपोषण करण्यात आले. यावेळी माजी मंत्री प्रा. राम शिंदे हे कर्जत तहसील कार्यालयात उपोषणात सहभागी झाले होते.

यावेळी त्यांनी कुकडी विभागाचे अधिकारी यांना आमदार रोहित पवार यांनी ६ जून रोजी आवर्तन सुटणार असल्याचे जाहीर केले ते सुटणार का? असे विचारले असता अधिकाऱ्यांनी जागेवरून १० तारखेला सुटणार असून पुढे पाच-सहा दिवसांनी पाणी कर्जत तालुक्यात येईल, असे सांगितले आणि माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी त्यांचेकडून लेखी पत्र घेतल्यानंतर उपोषण मागे घेतले.

लेखी पत्र कुकडीचे अभियंता रामदास जगताप आणि तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिले. माजी मंत्री शिंदे म्हणाले, एप्रिल महिन्यात पाणी वाटप समितीची बैठक झाली असताना आणि जानेवारीत तीन आवर्तन देण्याचे जाहिर केले असताना में महिन्याचे तिसरे उन्हाळी आवर्तन वेळेत न सोडल्याने पाणीटंचाई काळात टँकर, उन्हाळी पिके,फळबागाना या आवर्तनाचा फायदा झाला असता.

परंतु नियोजनचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असून मे महिना संपताना बैठक घेऊन पावसाळा सुरू होताना आवर्तन देण्याचा उपयोग काय असा सवाल आहे. हे आवर्तन १५ जूनच्या पुढे तालुक्याला मिळणार असताना लोकप्रतिनिधी ६ जूनला सुटणार असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करीत आहेत.

आजपर्यंतच्या इतिहासात कुकडीचे उन्हाळी आवर्तन हे जून महिन्यात कधीही सोडण्यात आले नाही. कुकडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी पत्रात कुकडी प्रकल्पाच्या उन्हाळी आवर्तन क्रमांक दोनसाठी कालवा सल्लागार समितीची बैठक झूम अॅपवर २९ एप्रिल २० रोजी पार पडून त्याबाबतचे सर्वाधिकार अध्यक्ष आणि जलसंपदामंत्री यांना देण्यात आले होते.

लाभक्षेत्रातील तीन जिल्ह्यातील सात तालुक्याच्या लोकप्रतिनिधीची सहमती होऊन २९ मे रोजी मान्यता दिली. त्यानुसार पिंपळगाव जोगे धरणातून मृत साठ्यातून ३.५० टीएमसी पैकी ३ टीएमसी व डिंभे आणि माणिकडोह धरणातून प्रत्येकी ०.५० टीएमसी असे ४ टीएमसी पाणी येडगाव धरणातून ६ जूनपासून जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here