अहमदनगर :- चार-पाच दिवसांपूर्वी वैजापूर येथून श्रीरामपुरात चारचाकीचा स्पेअरपार्ट घ्यायला आलेल्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संबंधित दुकानदाराचे धाबे दणाणले.

मात्र, माहिती लपवून न ठेवता हा दुकानदार स्वतःहून नगरपालिकेच्या रुग्णालयात गेला. तपासणीसाठी त्याला नगरला पाठवण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पऱ्हे यांनी सांगितले, स‌ंबंधित दुकानदाराला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. ज्या वैजापूरच्या व्यक्तीला कोरोना आढळला तो गाडीतून खाली उतरलाच नव्हता.

शिवाय त्याने मास्क बांधलेला होता, पण धोका नको म्हणून आपण रुग्णालयात आलो आहोत, असे दुकानदाराने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here