गोरगरिब लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी नवीन घर बांधण्यासाठी पंतप्रधान आवास योजना अंतर्गत नागरिकांना दोन लाख सदुष्ट हजार रुपये देण्यात येत होते ही योजना चालू झाल्यामुळे अनेकांनी नवीन घर बांधण्यासाठी आपले नगरपालिका पूर्वपरवानगीने राहत्या घर पाडून नव्याने बांधकाम चालू केलेले आहे ते सध्या दुसरीकडे स्वतः भाडे तत्त्वावर राहत आहे सध्या देशात कोरोना आजारामुळे सगळीकडे लोक डाऊन असल्यामुळे नागरिकांच्या हाताला काम नसल्याने घर भाडे देण्याची परिस्थिती नाही अशातच घर भाड्यासाठी घर मालकांचे तगादा चालू आहे यामुळे अनेकांचे घर मालकाबरोबर रोजच वादविवाद होत आहे यातून काही अनुसूचित प्रकार होण्याची दाट शक्यता आहे हे वाद टाळण्यासाठी स्वतःचे घराचे काम लवकरात लवकर व्हावे ही भावना नागरिकांची आहे तसेच अनेकांनी बांधकामासाठी नगरपालिकेने पंतप्रधान योजनेअंतर्गत सर्वे करून पहिला व दुसरा टप्पा चा निधी हा दिले असून काहींचे दुसरे व तिसरे टप्प्याची रक्कम रखडलेली असल्यामुळे त्यांचे घर काम पूर्ण होऊ शकलेले नाही व काहींनी पुढील रकमेचा टप्पा लवकर येत नसल्याने नागरिकांनी कार्की फायनान्स कंपनी पतसंस्था बचत गट व काहींनी व्याजाने पैसे घेऊन घर बांधकाम पूर्ण करण्याचे चालू केले आहे त्या पैशाचे तगादा देखील संबंधित बँक वाले देखील करत आहे त्यातच पावसाळा चालू झाल्याने सर्व नागरिकांचे मोठे प्रमाणात गैरसोय होत आहे या सर्व गोष्टींमुळे सर्व लाभार्थ्यांना मानसिक त्रास होत आहे याची गंभीर दखल घेऊन पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राहिलेली रक्कम त्वरित घेऊन सर्व लाभधारकांना सहकार्य करावे येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये लाभधारकांना राहिलेली उर्वरित रक्कम न मिळाल्याने सर्व लाभधारकास सह नगरपालिके समोर धरणे आंदोलन करण्यात येईल आंदोलना प्रसंगी काही अनुसूचित प्रसंग घडल्यास त्यास नगरपालिका जबाबदार राहील असे मनसेने आपल्या निवेदनात म्हटले आहे निवेदन देत या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे जिल्हा सचिव डॉ संजय नवतर शहर उपाध्यक्ष सचिन पाळंदे मनसे विद्यार्थी सेनेचे शहर संघटक विशाल शिरसाठ उपशहराध्यक्ष संदीप पिंनटो व बाळासाहेब भालेराव इत्यादी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here