नेवासे तालुक्यातील चिलेखनवाडीत विलगीकरण कक्षातील लोकांना सोडवण्यावरून सरपंच प्रा. भाऊसाहेब सावंत यांच्यावर हल्ला व महिला पोलिस पाटलास शिवीगाळ केल्याने माजी सरपंच तुकाराम गुंजाळ यांच्यासह दहा जणांवर,

तर विनयभंगाच्या आरोपावरून सरपंच सावंत यांच्यासह आठजणांवर कुकाणे पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हे नोंदवण्यात आले.

गेल्या वर्षभरापासून आजी-माजी सरपंचांच्या समर्थकांत धुमश्चक्री सुरूच आहे. बाहेरगावहून आलेल्यांना विलगीकरण कक्षात ठेवल्याच्या रागातून गुंजाळ व त्यांच्या समर्थकांनी सरपंच सावंत यांच्यावर हल्ला केला.

हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्ती करत असलेल्या पाेलिस पाटील मंगल सावंत यांना शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी माजी सरपंच गुंजाळ, एकनाथ महादू गुंजाळ, किरण एकनाथ गुंजाळ, नितीन एकनाथ गुंजाळ,

संजय पंढरीनाथ गुंजाळ, रोहिदास भगवान गुंजाळ, नवनाथ भानुदास गंुजाळ, सुखदेव एकनाथ पवार, दिलीप एकनाथ पवार व राजेंद्र सुखदेव पवार यांच्यावर सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ व दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या फिर्यादीनुसार पूर्ववैमनस्यातून चिलेखनवाडीतीलच एका महिलेचा हात धरून लज्जास्पद वर्तन केल्याच्या आरोपावरून सरपंच सावंत यांच्यासह आठ जणांवर विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला.

महिनाभरापूर्वीच आजी-माजी सरपंच्यांच्या गटांत परस्परविरोधी तक्रारींनंतर आता पुन्हा वाद उफाळून आला आहे. चिलेखनवाडीत तणावाची स्थिती आ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here