श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील तीन कोरोना बाधित आढळून आल्यानंतर, मुंबईहून गोंधवणी येथे आलेले व विलगीकरण कक्षात असलेले चार जणांन पैकी एक व्यक्ती आज पॉझिटिव्ह मिळून आला. काही दिवसांपूर्वी तब्येत खराब झाल्याने दोघांना नगर येथील सिव्हिल रुग्णालयात तपासणीसाठी हलविण्यात आले होते.
अधिक माहिती अशी की गोंधवणी येथे चौघे जण मुंबईहून आलेले आहेत, यापैकी एक लहान मुलगी असल्याचे समजत आहे, मुबईतील एक कोरोना पोसिटीव्ह रुग्ण असलेल्या कुटुंबातून हे लोक आलेले आहेत. यापैकी दोघे नगरला सिव्हिल रुग्णालयात ऍडमिट आहेत, ऍडमिट असलेल्या दोघांपैकी एका व्यक्तीचे रिपोर्ट आज पॉसिटीव्ह मिळून आला आहे.

बाहेरगावहून आलेल्याच लोकांमध्ये लक्षणे दिसत असल्याने बाहेरुन गावहून लोकांवरच आता विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आता बाजारपेठही बऱ्यापैकी खुली असल्याने काळजी घेण्याची गरज आणखी वाढली आहे. बाहेरुन येणार्या लोकांना इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईन करण्यात येते. तेथील १० दिवसाचा कालावधी झाल्यावर या लोकांना होम क्वॉरॅंटाईन करण्यात येते. अजूनही बाहेरगावहून लोक येत असल्याने क्वरटाईन करण्याचे काम सुरूच आहे. नागरिकांनीही याबाबत जागृक
राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here