संगमनेर (प्रतिनिधी) – निसर्ग चक्री वादळाचा फटका संगमनेर तालुक्याला बसला आहे. तालुक्यातील विविध गावांमधील सुमारे 360 कच्ची घरे कोसळली आहे. तर बोरबनमध्ये घराची भिंत अंगावर पडून एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे तर. पिंपरी लाैकी अजमपुर येथील शेतकरी राजु पिंजारी याच्या येथे गायांचे छप्पर उडाले आत्तापर्यंत सहा जनावरे दगावल्याची माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे तर फळपिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

तहसिलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल कर्मचारी, कृषी कर्मचारी नुकसानीचे पंचनामे करत आहे.
बुधवारी तालुक्यात जोरदार वादळ व पावसामुळे अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली. अनेक घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. वादळ सुरु झाल्याने विज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. चक्री वादळ व पावसामुळे अनेकांचे घरांचे पत्रे उडाले, भिंती पडल्या, डाळिंबाचे फुल व फळ पडले, कणसे असलेली मक्याची झाडे वजनामुळे भुईसपाट झाली. जनावरांचे गोठे पडले, बहुतांशी गावात विजेचे पोल पडले. मोठ मोठी झाडे रस्त्यावर कोसळली. कांद्याची शेड, शेतातील उभी पिके यांचे मोठे नुकसान झाले आहे. पठार भागातील बोरबनमध्ये चक्री वादळामळे घराची भिंत कोसळून पांडुरंग भुतांबरे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

निसर्ग चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी 1 वाजता विज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. तर प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व तहसिलदार अमोल निकम यांनी नागरीकांनी घराबाहेर पडू नये, पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवा असे आवाहन केले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here