टाकळीभान ( वार्ताहर ) पर्यावरणाचे संतुलन राखायचे असेल तर झाडे लावली पाहीजेत. हे संतुलन राखले गेल्यास अनेक संकटावर मात करता येईल. प्राईड आकॕडमीने आजच्या पर्यावरण दिनी वृक्ष रोपनाचा आयोजित केलेला कार्यक्रम स्तुत्य आहे असे प्रतिपादन आ.लहु कानडे यांनी टाकळीभान येथे पंचायत समिती सदस्या डाॕ. वंदना मुरकुटे यांच्या प्राईड आकॕडमी या शिक्षण संस्थेच्या टाकळीभान येथील विस्तारीत शाखेत वृक्ष रोपन कार्यक्रमात बोलताना केले. श्रीरामपुर न.पा.चे उपनगराध्यक्ष करण ससाने, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण नाईक, माजी सभापती सचिन गुजर, माऊली प्रतिष्ठाणचे माऊली मुरकुटे, विष्णुपंत खंडागळे, आशोकचे माजी संचालक कार्लस साठे, मुळा प्रवरेचे संचालक चिञसेन रणनवरे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना आ.कानडे म्हणाले कि, तालुक्यात टप्या टप्याने विकास कामे सुरु आहेत. तालुक्यातील हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. गावाची ख्यातीही मोठी आहे. महादेव मंदिराजवळील नाल्यावरील पुलासाठी ५ लक्ष व रस्त्यासाठी १० लक्ष निधी दिलेला आहे. मिळणाऱ्या निधीतुन दर्जेदार कामे झाली पाहीजेत. निधीसाठी आज मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यांची दुरावस्था झाल्याने निधीची मागाणी होत आसली तरी मोठ्या दळणवळणाच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्राधान्य क्रम देवुन या निधीचा वापर करावा. डाॕ. वंदना मुरकुटे यांचे या शैक्षणीक संस्थेसाठी मोठे योगदान आहे. शैक्षणीक संस्था चालवणे जिकरीचे काम आसले तरी डाॕ. वंदना मुरकुटे नेटाने ते काम पुढे नेत आहेत. पर्यावरण दिनी वृक्ष रोपनाचा कार्यक्रम आयोजित करुन निसर्गाचा व पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम त्यांच्या या उपक्रमातुन केले जाणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखने गरजेचे झाले आहे. त्यामुळे अनेक संकटावर मात केली जाणार आसल्याचे सांगुन कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाने, सचिन गुजर यांनीही मार्गदर्शन केले.डाॕ. वंदना मुरकुटे यांनी त्या चालवत आसलेल्या शिक्षण संस्थेचा लेखाजोखा मांडला. यावेळी ग्रा.प.सदस्य भारत भवार, आविनाश लोखंडे, माजी चेआरमन राहुल पटारे, माजी सरपंच भाऊसाहेब मगर, बंडुतात्या पटारे, शिवाजी धुमाळ, बाबासाहेब तनपुरे, पोपटराव पटारे, देवा कोकणे, बाबासाहेब बनकर, विलास दाभाडे, सोमनाथ पाबळे, रमेश धुमाळ, श्रीधर गाडे, प्रल्हाद कापसे, अर्जुन भालेराव, विलास सपकळ, संदिप जावळे, अबासाहेब रणनवरे, बंडोपंत बोडखे, नारायण काळे, दादासाहेब पटारे, बी.डी.शिंदे आदी उपस्थित होते. अर्जुन राउत यांनी यावेळी सुञसंचलन केले तर कार्लस साठे यांनी आभार मानले. सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन करीत बैठक पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here