जामखेड नगरपालिकेच्या दहा नगरसेवकांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.

तीन महिन्यांपासून जामखेड नगरपालिका नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्यावर राजकीय दबाव आणला जात आसल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले.

या निर्णयानंतर या नगरसेवकांनी हा निर्णय घेतला. गेल्या तीन महिन्यांपासून निखिल घायतडक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबावतंत्र चालू होते. लाँकडाऊनमुळे थांबलेले दबावतंत्र दोन दिवसात पून्हा सूरू झाले.

याबाबत नगराध्यक्षांनी आपल्या सहकारी नगरसेवकांना याची कल्पना दिली त्यानुसार माजी नगराध्यक्षा प्रीती विकास राळेभात, नगरसेवक शामीर सय्यद, संदीप गायकवाड,

ऋषिकेश बांबरसे, गूलशन अंधारे, लता संदीप गायकवाड, सुरेखा भाऊराव राळेभात, सुमन आशोक राळेभात, मेहरुनिसा शफी कूरेशी, जकीया आयुब शेख, या दहा नगरसेवकांनी आपले राजीनामे नगराध्यक्ष निखल घायतडक यांच्याकडे दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here