राज्यात आज १३९ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या २८४९वर गेली आहे. आज दगावलेल्या रुग्णांपैकी मुंबईत सर्वाधिक ५४ तर ठाण्यात ३० रुग्ण दगावले आहेत. तर आज २४३६ नवे रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या ८० हजार २२९ झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोरची चिंता वाढली आहे


मुंबई: राज्यातील करोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. राज्यात काल १२२ जण दगावलेले असतानाच आज पुन्हा १३९ रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या २८४९वर गेली आहे. आज दगावलेल्या रुग्णांपैकी मुंबईत सर्वाधिक ५४ तर ठाण्यात ३० रुग्ण दगावले आहेत. तर आज २४३६ नवे रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या ८० हजार २२९ झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोरची चिंता वाढली आहे.

सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख २२ हजार ९४६ नमुन्यांपैकी ८० हजार २२९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याचे प्रयोगशाळा चाचण्यांचे दर दशलक्ष प्रमाण ३८२७ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २८३२ इतके आहे. राज्यात ५ लाख ४५ हजार ९४७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ३७५ खाटा उपलब्ध असून सध्या ३० हजार २९१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज सर्वाधिक ठाणे परिमंडळात एकूण ९३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात मुंबईतील ५४, ठाण्यातील ३०, वसई-विरार आणि भिवंडीतील प्रत्येकी एका आणि कल्याण-डोंबिवलीतील ७ रुग्णांचा समावेश आहे. तर नाशिक परिमंडळात २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात जळगावमधील १४, मालेगाव ८ आणि नाशिकमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. पुणे परिमंडळात १६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून त्यात पुण्यातील १४ आणि सोलापुरातील दोघांचा समावेश आहे. रत्नागिरीत ५ आणि औरंगाबादमध्ये एका बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे.


आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७५ पुरुष तर ६४ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १३९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७८ रुग्ण आहेत तर ५३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या १३९ रुग्णांपैकी ११० जणांमध्ये ( ७९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २८४९ झाली आहे.


आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी २७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २१ एप्रिल ते २ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ११२ मृत्यूंपैकी मुंबई ४१, जळगाव -१३, ठाणे ३०,कल्याण डोंबिवली -७, मालेगाव -८, रत्नागिरी -५, पुणे- ३, भिवंडी -१, सोलापूर -२, नाशिक २ असे मृत्यू आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here