स्वातंत्र्यानंतर राज्याने खूप प्रगती केली. दळणवळणाच्या बाबतीत राज्यात अनेक बदल झाले.

परंतु असे आतानाही नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील तेलकुडगाव या गावात स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरही एसटी बस पोहोचली नसल्याचे वास्तव आहे.

कुकाण्यापासून दहा किलोमीटर अंतरावर तेलकुडगाव गाव आहे. उसाचे आगार म्हणून या परिसराकडे पाहिले जाते. गावातील रस्ताही व्यवस्थित आहे.

असे असतानाही ‘हात दाखवा गाडी थांबवा’ या योजनेच्या महामंडळाच्या घोषणेपासून तेलकुडगावकर मुकले आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या स्वत:च्या गाडीने जावे-यावे लागत आहे.

या गावात लालपरी धावण्यासाठी नेवासे आगार व्यवस्थापनाने मार्ग शोधणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महामंडळाच्या नफ्याबरोबर

गावाला लालपरीचे दर्शन होऊन वृद्धांनाही प्रवास करण्यास मदत होईल. त्यामुळे या गावात परिवहन मंडळाने लवकरच बस वाहतूक सुरु करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here