नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अव्वल ठरले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले , लोकप्रियतेत माझा नंबर वरचा येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल हेच माझे ध्येय आहे तसेच त्यांनी सर्वांचे आभार मानले.
देशातील विविध राज्यातील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांच्या लोकप्रियतेचे बद्दल आएएनएस आणि सी व्होटर्स यांनी सर्व्हे केला. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 76.5 टक्के मते मिळून लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे.
याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे माझे एकट्याचे यश नाही. सहा महिन्यांच्या काळात शिवरायांचे हे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे हे यश आहे.
मुख्यमंत्रिपद हे निमित्त आहे. महाराष्ट्राची सेवा घडत आहे हे महत्त्वाचे. लोकप्रियतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल हेच माझे ध्येय आहे, असे ते म्हणाले.
Home Uncategorized महाराष्ट्राला जगात पहिल्या क्रमांकाचे राज्य करणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…