अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील सकाळी प्राप्त अहवालानुसार 09 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असतानाच आज दुपारी पुन्हा 03 नवे रुग्ण आढळले.


त्यामुळे नगर मधील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दुपारी तीन वाजेपर्यंत 12 झाली आहे.जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 207 झाली आहे.

कोपरगाव येथील डॉक्टर महिलेचा तसेच संगमनेर येथील 02 व्यक्तीचा खाजगी प्रयोगशाळेत कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

याची नोंद आयसीएमआरच्या पोर्टलवर घेण्यात आल्याने रुग्ण संख्येत तीन रुग्णांची आणखी भर पडली आहे.

दरम्यान आज अहमदनगर जिल्ह्यातील १४ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून या सर्व रुग्णाना आज डिस्चार्ज मिळाला आहे .

यात, राहाता तालुक्यातील ०५, अकोले तालुक्यातील ०२, संगमनेर तालुक्यातील ०३

तर पारनेर, शेवगाव, राहुरी आणि कर्जत तालुक्यातील प्रत्येकी एक अशा रुग्णाचा समावेश आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील १०९ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here