जिल्ह्यातील एका दैनिकाच्या वार्ताहरास कोरोनाच्या संशयावरून घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.
त्यांचे स्राव तपासणीसाठी पाठवले असता, त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.
निमोण येथील कोरोना बाधिताच्या संपर्कातील संगमनेरातील नवघर गल्ली येथील एका बाधिताच्या संपर्कात पत्रकार आल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांना तपासणीसाठी नेले होते.
शहरात कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात सदर पत्रकाराने आपले कर्तव्य बजावताना जीव धोक्यात घालून काम केले.
या वेळी त्यांनी शासकीय नियमांचे पालन करत पूर्ण खबरदारी घेतली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला.