जिदद् असेल तर काहीही अशक्य नाही हे श्रीरामपूर येथील १८ वर्षीय तरुणाने सिध्द केले आहे. ओंकार संतोष हासे हा भारतातील सर्वात तरुण वयातील शेअर मार्केट एक्सपर्ट बनला आहे. ओंकारला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व ओएमजी नॅशनल रेकॉर्ड यांनी त्याला
त्याच्या या उत्तुंग यशासाठी इंडियाज यंगेस्ट स्टॉक मार्केट एक्सपर्ट हा पुरस्कार प्रदान केला आहे.

ओंकार हा वयाच्या १६ व्या वर्षापासून शेअर मार्केट रिसर्चर व ॲनालिसिस एक्सपर्ट आहे. त्याची स्टॉक मार्केट क्षेत्रातील आवड व जिदद् यामुळे त्याने त्याचे ध्येय गाठले आहे. त्याने वयाच्या १८ व्या वर्षी ओएस कॅपिटल्स नावाची शेअर मार्केट रिसर्च कंपनी स्थापन केली आहे. अवघ्या दोन महिन्यात त्याने भारतातील विविध राज्यातील अनेक गुंतवणूकदार क्लायन्ट मिळविले आहेत.त्याची कंपनी एक उत्तम शेअर मार्केट प्रशिक्षण व रिसर्च यामुळे भारतातील एक उत्तम शेअर गुंतवणूक सल्लागार कंपनी बनली आहे.

ओंकार हा १२ वी सायन्स उत्तीर्ण असुन सध्या तो पुणे येथे संगणक शास्त्राचे शिक्षण
घेत आहे. तो शेअर मार्केट एक्सपर्ट बरोबरच इथिकल हॅकर व सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट देखील आहे. भारतीय शेअर मार्केट बरोबरच तो करंन्सी मार्केट व क्रिप्टो ट्रेडिंग एक्सपर्ट सुध्दा आहे. त्याने ओएस कॅपिटल्स सोबतच ट्रेडिक्रिप्टो हि क्रिप्टो ट्रेडिंग रिसर्च कंपनी स्थापन केली
आहे. या कंपनीद्वारे तो क्रिप्टो मार्केट गुंतवणूक संबंधी सेवा पुरवितो.

ओंकारची आवड व या क्षेत्रातील संशोधन यामुळे त्याने त्याच्या ध्येयाकडे वाटचाल
करत यश संपादन केले आहे. त्याने लॉकडाऊनच्या काळात अनेक तरुणांना शेअर मार्केट प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकरित्या आत्मनिर्भर बनविले आहे. त्याने शेअर मार्केट संशोधन विषयक अनेक मार्गदर्शक लेख लिहीले आहेत व लवकरच ते लेख तो पुस्तक स्वरूपात प्रकाशित करणार आहे. तो आज तरुण वर्गासाठी एक आदर्श बनला आहे.स्वतःच्या रिसर्चच्या
माध्यमातून गुंतवणूकदारांना उत्तम नफा मिळवून देणे व तरुण वर्गाला प्रशिक्षण देऊन
आर्थिकरित्या आत्मनिर्भर बनाविने हेच त्याचे ध्येय आहे. या तरुण उदयोजकाची ध्येयाकंडे वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here