अहमदनगर : संगमनेर शहरातील नवघर गल्लीतील एका मटकाकिंगला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या एका ४० वर्षीय व्यक्‍तीला देखील कोरोनाची बाधा झाली असतानाच आता त्यात आणखी तिघांची भर पडली आहे.

त्यात मोमीनपुरा, नाईकवाडापुरा, सिन्नर तालुक्‍यातील दोडी येथील एका ५९ वर्षीय कोरोनाचे संक्रमणझाल्याचे जिल्हा रुग्णालकडून प्राप्त झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

नाईकवाडपुरा, मोमीनपुरा, साळीवाडा आणि सिन्नर तालुक्‍यातील दोडी या वेगवेगळ्या ठिकाणी चार कोरोनाबधित रुग्ण आढल्यामुळे आता संगमनेरचा कोरोनाबधित रुग्णांचा आकडा ६१ वर गेला आहे.

संगमनेरला कोरोनाबधित रुणांचा आकडा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात संगमनेरची बाजारपेठ सुरू झाल्यामुळे ज्यास्तच चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

मागील शनिवारी संगमनेरला एकाच दिवशी सात रुग्ण आढळून आले होते. मात्र कालच्या शनिवारीही दिवसभरात चार रुग्ण आढळून आल्यामुळे संगमनेरकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here