श्रीरामपूर शहरातील जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळा या बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांसाठी विलगीकरण कक्ष करण्यात आली आहे केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून स्वतंत्र व्यवस्था व निधी येतो त्यांचा वापर हा कोरांन्टाईन लोकांना राहण्याचे व्यवस्था करण्यात वापरावा तसेच कोरांन्टाईन केलेला गोरगरीब लोकांना खाण्यापिण्याची व राहण्याची व्यवस्था केली पाहिजे कोरांन्टाईन झालेल्या बहुतेक लोक हे कामासाठी विविध जिल्ह्यांमध्ये गेले होते परंतु कोरोनाचा प्रसार हा मोठ्या शहरांमध्ये जास्त प्रमाणात वाढल्यामुळे या आजाराच्या धाकाने हे लोक गावाकडे येत आहे परंतु असे लोक गावाकडे येत असताना ते कोरोना पॉझिटिव्ह तसेच बाधित लोकांच्या संपर्कात येत असल्याने अशा लोकांना शाळा व महाविद्यालयांमध्ये ठेवू नये कारण काही दिवसाचा शाळा व महाविद्यालय चालू होण्याची शक्यता आहे शाळेमध्ये कोरांन्टाईन केलेल्या लोकांमुळे विद्यार्थ्यांना कोरोना आजार झाल्यास त्याला जबाबदार कोण अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणे कितपत योग्य आहे प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणे त्वरित थांबवावे व बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांना शाळा ऐवजी मंगल कार्यालय, मिटींग हॉल, हॉटेल अशा ठिकाणी कोरांन्टाईन करण्यात यावे व कोरांन्टाईन करत असलेल्या लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी यापुढे शाळा व महाविद्यालयात बाहेर जिल्ह्यातील लोकांना कोरांन्टाईन केल्यास प्रशासनाच्या विरोधात विद्यार्थी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल
असा इशारा मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विष्णू अमोलिक यांनी दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here