अहमदनगर जिल्ह्यातील मोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १ जुलैपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मोहा गावचे सरपंच शिवाजी डोंगरे यांनी दिली.

मोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात सरपंच शिवाजी डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी सरपंच डोंगरे म्हणाले की जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारयांनी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत,

ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा अशा सूचना दिलेल्या आहेत.
या सूचनेनुसार आज याबाबत निर्णय घेण्यासाठी ही बैठक बोलावली. मोहा जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांची संख्या १५० आहे.

त्यामुळे शाळा सकाळी व दुपारी अशा दोन शिफ्ट मध्ये भरविण्यात येईल. त्यासाठी सर्व शिक्षकांची तयारी आहे. गरज पडल्यास गावातील डीएड व बीएड झालेल्या काही युवक- युवतींची अध्यापनासाठी मदत घेतली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here