करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिस दलात करोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. राज्यात करोनाबाधिता पोलिसांचा आकडा ३००० पर्यंत पोहोचला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे

 


पुणेः करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिस दलात करोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. राज्यात करोनाबाधिता पोलिसांचा आकडा ३००० पर्यंत पोहोचला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तर, आतापर्यंत ३० पोलिसांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.


पोलिसांमधील वाढता संसर्ग ही पोलिस कटुंबीयांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांवर योग्य उपचार करण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत. राज्यात तब्बल ३७ हजार पोलिसांना सॉफ्ट ड्युटी दिली आहे. तर, ५० ते ५५ वर्षावरील २३ हजार पोलिस पोलिस ठाण्यातील ड्युटीवर आहेत. ड्युटीवर नसलेल्या १२ हजार पोलिसांनी पगारही वेळेत मिळत असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.


१० हजार कैद्यांना इमर्जन्सी पॅरोलवर सोडण्यात आलं

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या कैद्याना सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. राज्यातील कारागृहातून जवळपास ९६७१ कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले असून लवकरच उर्वरित कैद्यांनाही सोडण्यात येणार असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

राज्यातील ६० कारागृहातील कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात येणार आहे. कारागृहात ३८ हजार कैदी आहेत. सोशल डिस्टनसिंगसाठी ११ हजार अधिक कैद्यांना तातडीने पॅरोल मंजुर करून सोडण्यात येणार आहे.

पोलिसांनी काळजी घेण्याचे आवाहन


राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आज पुणे दौऱ्यावर होते त्यांनी यावेळी बंदोबस्तावरील कर्मचाऱ्याशी संवाद साधला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यासह येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे अजय वाघमारे हे उपस्थित होते. विमानतळावर आगमन झाल्यानंतर गृहमंत्री देशमुख हे येरवडा येथील अनाभाऊ साठे महामंडळ ई लर्निंग स्कुल येथे भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याशी सवांद साधत काळजी घेण्यास सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here