अतिसौम्य किंवा लक्षणांविरहित रुग्णांना घरीच अलग करून ठेवता येईल. डॉक्टरांनी अशा रुग्णांना प्रमाणित करण्याची अट सरकारने घातली आहे. तसेच सरकारकडे यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र देऊन घरी विलगीकरणाची अनुमती दिली जाणार आहे.

 
मुंबई:करोनाची सौम्य लक्षणे असलेल्या किंवा नसलेल्या आणि घरामध्ये विलगीकरणाची करणे शक्य असलेल्या व्यक्तींचे घरीच विलगीकरण करता येईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांच्या आधारे हे निर्देश देण्यात आले आहेत.

अतिसौम्य किंवा लक्षणांविरहित रुग्णांना घरीच अलग करून ठेवता येईल. डॉक्टरांनी अशा रुग्णांना प्रमाणित करण्याची अट सरकारने घातली आहे. तसेच सरकारकडे यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र देऊन घरी विलगीकरणाची अनुमती दिली जाणार आहे.

सतरा दिवसानंतर रुग्णाला विलगीकरणातून मुक्त करण्यात येईल. मात्र, त्यापूर्वी दहा दिवस रुग्णाला ताप आलेला नसला पाहिजे. घरचे विलगीकरण संपल्यानंतर पुन्हा करोनाची चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असेही राज्य सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

असे असतील निकष…

घरी पूर्णवेळ काळजी घेणारी व्यक्ती असावी. वैद्यकीय उपचार देणाऱ्या रुग्णालायांप्रमाणे योग्य त्या सोयीसुविधा असाव्यात

घरामध्ये या व्यक्तीच्या विलगीकरणासाठी सुविधा असाव्यात

वैद्यकीय उपचार देणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णाला अतिसौम्य किंवा लक्षणे नसल्याबद्दल वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित केलेले असावे

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार काळजीवाहू व्यक्ती व करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाने हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा डोस घ्यावा

आरोग्यसेतू ॲप मोबाइल फोनमध्ये डाऊनलोड केलेले असावे

रुग्णांची माहिती जिल्हा सर्वेक्षण अधिकाऱ्यांना देण्यात यावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here