कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील १४ वर्षीय मुलीस कोरोनाची बाधा झाली असून. कोपरगावात हा कोरोनाचा दुसरा रुण आढळला आहे.
मुलीवर कोपरगाव येथील कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये उपचार आहेत. कोपरगावातील १७ पैकी १ अहवाल निगेटिव्ह तर एक पॉझिटिव्ह आला.
कोरोनाबाधित डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या १ जणांचे तसेच ठाणे येथून आलेल्या दोन मुलींना धोत्रे येथील शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवले होते,
एकूण १७ जणांचे स्वॅब नगर येथे पाठवले. दरम्यान, यांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला.
डॉक्टर महिलेच्या संपर्कातील १५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. ठाणे येथून आलेल्या दोन मुलींपैकी एकीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.