कोरोनाच्या महामारीत युद्ध पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यालाच कोरोनाची लागण झाल्यामुळे संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्याचे नायब तहसीलदार असलेल्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
कोरोना काळात आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी पुण्याला गेले असता त्याठिकाणी हि लागण झाली असल्याचे बोलले जात आहे. काल रविवार दि.७ रोजी श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यावेळी रुग्णांना कोरोनाची लक्षणे आढळून आली असल्याने त्याठिकाणी त्यांची स्त्राव चाचणी करण्यात आली ज्यात ते कोरोना पॉझिटिव असल्याचे अहवालातून कळाले.
कोरोना बाधित अधिकारी गेल्या काही दिवसांत कुटुंब सदस्य, कार्यालयीन कर्मचारी आणि बाहेरील किती व्यक्तींच्या संपर्कात आले होते याची माहिती आता प्रशासन घेत आहे.
परंतु या वृत्तामुळे महसुलातील सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची घबराट झाली आहे. प्रशासनातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण होण्याची हि पहिलीच घटना आहे.