राहता (प्रतिनीधी) राहता तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होतांना दिसून येत आहे. आज दोघांचे अहवाल कोरोना पॉझेटिव्ह आल्याचे निष्पण झाले आहेत. यात राहता शहरातील बोठे गल्ली येथे राहणा-या 36 वर्षीय व्यक्ती आणि तालुक्यातील निमगाव येथील 23 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझीटिव्ह आढळून आला आहे.

राहता शहरातील बोठे गल्ली परिसर बंद करण्याचे काम प्रशासनाने सुरु केले असून या भागातील दुकाने बंद केली जात आहे. कोरोना बाधीत आठलेला हा रुग्ण राहता शहरातीलच असून त्याला कोरोना संसर्ग कसा झाला याचा शोध घेतला जात आहेत. तसेच त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून त्यांना क्वारंटाईन केले जाणार आहे. तर रुबिना नगर येथील एकाचे स्त्राव नमुने आधिच पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे. संबधीत व्यक्ती मुंबई येथे जावून आल्याने त्याचे नमुने घेतल्याचे सांगीतल जात आहे.
निमगाव आधीच कंटेन्मेंट झोन जाहीर असून निमगाव निघोज येथील 23 वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्हआला आहे. यामुळे आज जिल्ह्यात 06 नवीन रुग्णांची भर पडलीय…संगमनेर शहरात देखील तिघांना कोरोनाची लागण झाली असून मदिनानगर येथील 23 वर्षीय महिला, पुनानाका नाईकवाडपुरा येथील 35 वर्षीय व्यक्ती आणि मदिना नगर येथील 52 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित निष्पण झाले आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here