रात्री घरात घुसून चोऱ्या करणारे चोरटे मुद्देमालासह अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही कारवाई केली आहे. संदेश उर्फ काळ्या ताज्या भोसले (वय २०), , रुपेश ताज्या भोसले (वय २१, दोघे रा.सैनिकनगर, भिंगार) असे पकडण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सुरु असताना हा गुन्हा संदेश उर्फ काळ्या ताज्या भोसले, रुपेश ताज्या भोसले (दोघे रा.सैनिकनगर, भिंगार) या दोघांनी केला, अशी माहिती स्था.गु.शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली.

त्यानुसार पो.नि.पवार यांच्या सूचनेनुसार स्था.गु.शाखेच्या पथकाने सापळा लावून चोरट्याचा पाठलाग करून सैनिकनगर (भिंगार) येथे पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता, सदरचा गुन्हा हा साथीदार शरम्या हुरमाशा काळे (रा.अकोळनेर ता.नगर), काळ्या हुरमाशा काळे आम्ही मिळून केल्याची कबुली दिली.

यावेळी आरोपीकडून ४ हजार रु.चा रेड मी कंपनीचा व ६ हजार रु.चा ओपो कंपनीचा मोबाइल काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले. दरम्यान, आरोपींनी मार्च महिन्यात मुकुंदनगर येथे व मे महिन्यात नामदेव चौक, सावेडी, अहमदनगर येथील दुकानातून रोख रक्कमेची चोरी केल्याची कबुली दिली.

स्था.गु. शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांच्या सूचनेनुसार सपोनि संदीप पाटील, पोहेकाँ सुनील चव्हाण, दत्ता हींगडे, पोना भागीनाथ पंचमुख, आण्णा पवार, रविंद्र कर्डिले, दीपक शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, पोकाँ योगेश सातपुते, सागर सुलाने, चापोहेकाँ बाळासाहेब भोपळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here