राहुरी तालुक्यात ट्रॅक्टर व मोटरसायकल अपघातात एका तरूणाचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी झाला. जखमीला नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राहुरी रेल्वेस्थानकाजवळ मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास मोटरसायकल व ट्रॅक्टरची धडक होऊन पंकज जाधव (वय १९) व सूरज आढाव (वय १८, मानोरी) हे दोन मित्र गंभीर जखमी झाले.
जखमींना ग्रामीण रूग्णालयात नेण्यासाठी ग्रामस्थांनी मदत केली. मात्र, नगरला हलवण्याचा सल्ला ग्रामीण रूग्णालयातील डाॅक्टरांकडून मिळाला. पंकजची प्राणज्योत रस्त्यातच मालवली