पाथर्डी : डोक्याला रिव्हॉल्वर तर पोटाला चाकू लावून अज्ञात दोन इसमांनी दोघांना लुटल्याची घटना तालुक्यातील फुंदे टाकळी फाट्याच्या पुला जवळ घडली आहे. सोमवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
फुंदे टाकळी येथील वैष्णव पोपट फुंदे,अंगद बाबासाहेब फुंदे हे गावातून अँक्टिवा मोपेड क्र. एम एच 16 सी. एस. 3295 हीच्या वरून पाथर्डी कडे जात असताना त्यांच्या पाठीमागून काळ्या रंगाची होंडा शाइन मोटारसायकवर दोन अनोळखी इसम तोंड बांधून आले.
पाठीमागून आलेल्या आरोपीनी वैष्णव पोपट फुंदे याच्या डोक्यास रिव्हाल्वर तर पोटास चाकू लावला त्याच्या जवळील पाच हजारांची रोख रक्कम, तर अंगद बाबासाहेब फुंदे याला हि धाक दाखवून त्याच्या कडील मोबाईल व गळ्यातील दीड तोळ्यांची सोन्याची चैन असा ऐवज जबरीने चोरून घेऊन गेल्याचा प्रकार घडल्याने सर्वत्र दहशत निर्माण झाली आहे.
गुन्हेगार प्रवृत्ती पोलीस प्रशासनाला वरचढ होतांना अशा घटनांमुळे दिसत आहे.पोलिसांनी वेळीच गुन्हेगारीचा बिमोड करावा,पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवत आरोपींना त्यांची जागा दाखवावी अशीच काहीशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून असते.
अज्ञात दोन इसमांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे ,पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी भेट दिली आहे.या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड करत आहेत.