संगमनेर तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या नायब तहसीलदार यांना कोरोनाची लागण झाली आहे ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पुणे येथे गेले होते

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचा साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे या कायद्याचे उल्लंघन करीत संगमनेर ते पुणे असा प्रवास करणाऱ्या संगमनेर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार विरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नायब तहसीलदार यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत ते व्हेंटिलेटरवर आहेत नायब तहसीलदार यांनी उल्लेखनीय असे कामे केली आहेत एक शासकीय अधिकारी कॉविड योद्धा म्हणून ते कार्यरत होते अतिशय गंभीर परिस्थितीत असताना उपचार घेत असताना त्यांच्यावर पोलिसांनी घाईने गुन्हा दाखल करण्याची कारवाई ही असमर्थनीय आहे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास गुन्हा दाखल होत असेल तर काम कसे करणार असा प्रश्न आहे

नायब तहसीलदार मृत्यूशी झुंज देत असताना त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई अन्यायकारक आहे हा गुन्हा मागे घ्यावा अन्यथा सर्व आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य वगळता इतर कामावर बहिष्कार टाकतील असा इशारा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे याबाबत मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here