पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील माजी सैनिक मनोज औटी यांचा खून केल्याप्रकरणी चार आरोपींना सुपे पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयापुढे उभे करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सोयरिकीच्या वादातून ८ जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तीन महिन्यांपूर्वी सैन्यातून निवृत्त झालेल्या मनोज संपत औटी यांना दगड व लोखंडी पाइपने बेदम मारहाण करण्यात आली होती.

मनोज यांच्या डोक्यावर दगड तसेच लोखंडी पाइपचे असंख्य प्रहार झाल्याने डोक्यास गंभीर इजा झाली व औटी हे जागीच बेशुद्ध पडले. त्यानंतर मारेकरी तेथून पसार झाले.

औटी यांच्या नातेवाईकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु डोक्याची जखम गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

दोन दिवस उपचार सुरू असताना औटी यांचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. रात्री उशिरा सुपे पोेलिसांनी फरार आरोपी गुड्डू ऊर्फ सौरव याचे वडील गणेश सुखदेव पोटघन (रा. जातेगाव), त्याचा मामा संदीप वरकड (रा. घोसपुरी, ता. नगर) यांना रात्री उशिरा अटक केली.

उर्वरित चारपैकी गुड्डू ऊर्फ सौरव गणेश पोटघन व अक्षय बापू पोटघन (दोघेही जातेगाव) यांना शुक्रवारी रात्री म्हसे (ता. श्रीगोंदे) येथून अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here