अहमदनगर :- आमदार जगताप यांच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी वारेमाप गर्दी केली होती.आमदाराचाच वाढदिवस त्यात सत्ता असल्याने भिती कोणाची़? त्यामुळे सारे हावशे गवशे गर्दीने जमा झाले.

अनेकांनी त्यावेळी मास्कचा वापर केलेला नव्हता. सोशल डिस्टन्सचा तर पुरता फज्जा उडविला होता. कार्यकर्त्यांसह गर्दी केल्याने, मास्क न वापरल्याने पोलिसांनी नेत्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखविले आहे.

करोना संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील सर्व मंत्री दिवसरात्र मेहनत घेत आहेत. परंतु, राज्यातील सत्तेत असलेल्या पक्षाच्या आमदार असलेल्या जगताप यांनी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडविला.

विनामास्क एकत्र येऊन, कोरोना आजारासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून आमदार संग्राम जगताप आणि त्यांच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांविरुद्ध काल रात्री उशिरा कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की 12 जून 2020 रोजी दुपारी बाराच्या सुमारास आमदार जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त

अभिजित खोसे, बाबा गाडळकर, संतोष ढाकणे, माऊली जाधव यांच्यासह 25 ते 30 कार्यकर्ते आयुर्वेद कॉलेज परिसरातील आमदार जगताप यांच्या कार्यालयासमोर जमले होते.

जगताप यांच्यासह या कार्यकर्त्यांनी मास्क घातलेले नव्हते. त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे.

या फिर्यादीनुसार भारतीय दंड विधानाच्या कलम 188 व 269 अन्वये जगताप यांच्यासह 25 ते 30 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here