देवळाली प्रवरा :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहुरी फॅक्टरी शाखेच्यावतीने १२ जून रोजी रक्तदान शिबिर संपन्न झाले कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रक्ताची गरज असताना मनसेच्या राहुरी फॅक्टरी शाखेच्या मनसैनिकांनी व अर्पण ब्लड बँक अहमदनगर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर आयोजित केले होते सोशल डिस्टंसिंग तसेच सॅनिटायझर व मास्कचा वापर करून रक्तादान पार पडले जवळपास ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले व रक्तदात्यांना मनसेच्यावतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले या शिबिरास मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे जिल्हा सचिव डॉ संजय नवथर तालुकाध्यक्ष अनिल डोळस चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे शिवसेना शहर प्रमुख विजय गव्हाणे साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे आदर्श पतसंस्थेचे चेअरमन अण्णासाहेब चौथे मा. नगराध्यक्ष दीपक त्रिभुवन नितीन कलापुरे वैभव गाडे नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते शिबिराचे उद्घाटन बाबासाहेब शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले शिबिर यशस्वी ते साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष आकाश शिंदे तालुका सचिव अनिल गीते प्रमोद विधाटे गोरक्षनाथ पवार श्याम सूर्यवंशी किरण कोबरणे अमोल पाटोळे अनुप राऊत यांच्यासह विद्यार्थी सेनेचे संदेश पाटोळे अंकुश ससे कुणाल पवार निखिल घावटे शुभम कुंभार कृष्णा खर्डे आदि मनसैनिक प्रयत्नशील होते तसेच मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन निखिल सांगळे साहिल पठाण सचिन सोनवणे साहिल पवार तुषार सांगळे आदींसह असंख्य कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत व तालुकाध्यक्ष अनिल डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेमध्ये प्रवेश करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here