अधिक माहिती अशी की दिनांक १६/०६/२०२० रोजी दुपारी २ ते २.३० या दरम्यान मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष विकी राऊत हे त्यांच्या मित्रासोबत श्रीरामपूर येथील कारागृहामध्ये मित्राचा भाऊ कारागृहामध्ये होता व त्याचे जामीन झाल्याबद्दल कोर्टाचा लखोटा घेऊन कारागृहामध्ये जेलर यांना देण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल हे आले व तुम्ही येथे काय करता येथून लगेच बाहेर चालते व्हा असे म्हणत त्या वेळेस विकी राऊत यांनी त्यांच्या हातातील लखोटा दाखवत म्हणाले की आम्ही लखोटा जेलर साहेबांना देण्यासाठी आलो आहे असे म्हटल्यानंतर मला उलटी उत्तर देतो का असे म्हणत लगेच विकी राऊत यांच्या दोनदा कानामागे मारली व अजून पण मारण्यासाठी अंगावर आले असता त्याप्रसंगी जेलर भाऊसाहेबांनी त्यांना धरल्यामुळे विकी राऊत यांचा थोडक्यात जिव वाचला व खालच्या पातळी भाषेत शिवीगाळ केली पुन्हा येथे दिसल्यास व माझ्या समोर आलेस खोटे गुन्हे दाखल करून तुला जेलमध्ये सडविल अशी धमकी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र खळेकर यांनी दिली त्यावेळी त्यांची वागणूक एका पोलिसांसारखी दिसून आली नाही तर एका गुंडा प्रमाणे दादागिरी करून दहशत पसरविण्याच्या उद्देशाने वागत होते असे कृत्य बघून ते त्यावेळी दारूच्या नशेत होते असे जाणवून आले आज दारूच्या नशेत दोन कानमाघे मारले व खालच्या पातळी भाषेत शिवीगाळ करून खोट्या गुन्ह्यात जेलमध्ये सडवण्याची धमकी दिली यावरून असे लक्षात आले की उद्या एखाद्याचा खून करायला देखील पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र खळेकर घाबरणार नाही या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र खळेकर यांनी घटनास्थळी कोणती नशा केली होती याची चौकशी करून त्वरित त्यांना निलंबित करण्यात यावी जेणेकरून यापुढे अशी गुंडगिरी करणार नाही यासाठी निलंबनाची कारवाई होणे गरजेचे आहे स्वतः पोलीस कॉन्स्टेबलने कायद्याचे उल्लंघन केल्याने व मारहाण केल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी राज साहेबांच्या आदेशानुसार आम्ही कायम पोलिसांचा आदर करत आलो आहे परंतु अशा काही लोकांमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होत असेल तर अशा लोकांवर त्वरित कारवाई करावी अन्यथा न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणाम आपण व आपले पोलिस प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने साहेब यांना देण्यात आले निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे जिल्हा सचिव संजय नवथर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप तालुकाध्यक्ष सुभाष सोनवणे शहराध्यक्ष निलेश सोनवणे कामगार सेना सचिव नंदू गंगावणे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष विकी राऊत विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष विष्णू अमोलिक तालुका संघटक गणेश दिवसे तालुका उपाध्यक्ष अतुल तारडे शहर सचिव स्वप्नील सोनार शहर संघटक जावेद शेख शहर उपाध्यक्ष राजू शिंदे उपशहर अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे उपशहर अध्यक्ष सचिन पाळंदे उपतालुका अध्यक्ष नवनाथ बोराडे उपशहर अध्यक्ष संदीप पिंटू इत्यादी मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here