महाले प्रतिष्ठान संचलित महाले पोदार लर्न स्कूल श्रीरामपूर आयोजित केलेल्या ऑनलाईन वेबिनार या मालिकेतील दुसरे पुष्प दिनांक 16 जून 2020 रोजी गुंफले गेले. Exploring Wild India या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय तज्ञ व Wild Life Biologist श्री आनंद पेंढारकर यांनी विद्यार्थ्यांना स्लाईड शो आणि माहितीपूर्ण निवेदनातून हिमालय ते अंदमान निकोबार भारत-भ्रमण घडवले. श्री आनंद पेंढारकर हे SPROUTS या संस्थेचे CEO पासून Ecotourism व Environmental Consultant आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समित्यांवर कार्यरत आहेत .
भौगोलिक परिस्थिती, हवामान, तेथील मनोरंजक प्रथा, खाद्य वैशिष्ट, पेहराव या बद्दल निवेदन केले. हिमालय, लेह लडाख, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, केदार कांटा ट्रेक, सिक्कीम ,भुतान, अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम ,पश्चिम बंगाल ,ओरिसा, मध्य प्रदेश ,राजस्थान ,गुजरात, मेळघाट ,महाराष्ट्र ,कर्नाटक, दांडेली, अंदमान – निकोबार इत्यादीबद्दल प्रवास चित्रे , माहिती यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंददायी अनुभव घेतला . त्यांना नवीन क्षेत्रे , प्रेरणा व वेगळी दृष्टी मिळाली . यावर्षी पर्यावरण दिवसाच्या Biodiversity कल्पनेला अनुसरून हा कार्यक्रम आयोजनाचे तसेच महाले पोदार स्कूल मधील विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली बीज गणपती कार्यशाळा, नैसर्गिक रंगांनी होळी ,मातीचे किल्ले असे पर्यावरण सुरक्षितेचे व निसर्गाची जवळीक साधणारे प्रकल्प राबवल्याचे सूत्रसंचालनात नमूद केले .हे वेबिनार आवडल्याने विद्यार्थ्यांनी अनेक वैविध्यपूर्ण प्रश्न विचारल्यावर त्यांना प्रेरणादायी, समाधानकारक उत्तरे मिळाली. या क्षेत्रातील अनेक शिक्षण संधी विषयी माहीती मिळाल्याने सर्व पालकांनी व्यक्त केलेले समाधान ही वेबिनार यशस्वितेची पावती ठरली .
संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री. सचिन प्रकाश महाले व श्री. सचिव अमोल प्रकाश महाले यांच्या संकल्पनेतून उत्तम शैक्षणिक दर्जा राखण्यासाठी हे वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे .अतिशय प्रशस्त व निसर्गसुंदर परिसर लाभलेल्या महाले पोदार लर्न स्कूल तर्फे आतापर्यंत पर्यावरण रक्षण, जतन, संवर्धन अनेक प्रकल्पाद्वारे केले गेले आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्राचार्य सौ .श्वेता दंड यांचे मार्गदर्शन लाभले .कार्यालयीन अधिक्षक श्री.आशिष गरुड व श्री. श्रीकांत लांडे तसेच सूत्रसंचालक श्रीमती. वर्षा आगाशे यांचे सहाय्य लाभले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here