राहता तालुक्यातील ममदापूर येथील महिला नामे नजमा कासम इनामदार व मुलगा उस्मान कासम इनामदार यांना शोएब पटेल व त्याचे चार भाऊ व काही अज्ञात इसमांनी वावरात लाकडी दांडक्यासह धारदार शास्त्राने हात पाय व पाठीच्या मणक्यावर मारून गंभीर जखमी केले आहे सदर तरुणांसह महिलेस पुढील उपचारासाठी लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सदर पटेल कुटुंबीय या विरोधात मागील वर्षी व तीन दिवसापूर्वी लोणी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केलेल्या असून देखील सदर पटेल कुटुंबीयांनी पूर्वनियोजित कट करून उस्मान इनामदार व त्याची आई नजमा हिस जबर मारहाण केली जमिनीच्या वादातून सदर घटना घडली असून माननीय न्यायालयात दिवानी स्वरूपाचे खटले देखील चालू आहेत पोलिसांनी समज देऊन देखील पटेल कुटुंबीयांनी सदर तरुणाला जबर मारहाण करणे म्हणजेच सदर गुंड प्रवृत्तीच्या कुटुंबीयांना पोलिसांचा देखील धाक राहिला नसल्याचे स्पष्ट होते सदर कुटुंबियांचे गावात देखील वेगवेगळ्या लोकांशी भांडणे होत असतात पोलीस प्रशासनाने सदर घटनेची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी इनामदार कुटुंबीय करीत आहे