श्रीरामपूर मनसेच्यावतीने चीन देशाचा राष्ट्रध्वज जाळून निषेध व्यक्त करण्यात आला या आंदोलना प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यापुढे कुठल्याही प्रकारच्या चायना वस्तू वापरणार नाही अशी शपथ घेण्यात आली. तसेच शहीद झालेल्या भारतीय जवान अमर रहे अमर रहे. चीन देशाचा निषेध असो चायना वस्तूवर बहिष्कार घाला अश्या घोषणा देऊन चीन देशाचा झेंडा जाळून निषेध व्यक्त करण्यात आले.

या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष मा. बाबा शिंदे, जिल्हा सचिव डॉ संजय नवथर, उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप, शहर अध्यक्ष निलेश सोनवणे, तालुका सचिव करण कापसे, तालुका संघटक गणेश दिवसे, व उपशहराध्यक्ष राजू शिंदे, मनविसेचे शहरसंघटक विकास शिंदे, उपशहराध्यक्ष सचिन पाळंदे, उपतालुकाध्यक्ष अमोल साबणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here