कोरोना संसर्ग असल्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आलेला होता यात सर्व व्यापार व्यवसाय छोटे-मोठे उद्योगधंदे हे बंद पडले होते अशा परिस्थितीमध्ये लोकांचा हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली होती अशा परिस्थितीमध्ये विविध फायनान्स कंपनी कडून कर्ज घेतलेले कर्जाची रक्कम सध्या तरी लोकांना कडे नाही याची जाणीव ठेवून केंद्र व राज्य सरकारला याची जाणीव झाल्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी गेल्या काही दिवसापूर्वी घोषणा केली होती की लॉकडाउन काळामध्ये कोणीही कर्जाचे हप्ते भरून नाही परंतु शासनाच्या या नियमाची पायमल्ली करत काही फायनान्स कंपनी यांनी वसुलीचा धडाका चालू ठेवला अशाच आशयाचे निवेदन काही दिवसापूर्वी मनसे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले होते तसेच फायनान्स कंपनी मुळे एका नागरिकाचा जीव सुद्धा केलेला असून या फायनान्स कंपनीला कुठेतरी वचक बसला पाहिजे व तसेच अनेक नागरिकांचे न सांगता फायनान्स कंपनीकडून घेतलेले मोबाईल हे कर्जाचा हप्ता न भरल्यामुळे कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आले होते त्याबाबत फायनान्स कंपनीला अधिकाऱ्यांना विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहे यापुढे असे जर चालू ठेवले तर मनसे आपल्या शैलीमध्ये उत्तरे देतील याची फायनान्स कंपनी यांनी नोंद घ्यावी तसेच मनसेला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here