कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच दिवसापासून मार्केट बंद होते अशा परिस्थितीमध्ये हातावरच्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झालेल्या असून आज गोंधवणी व महाकाळ वडगाव या ठिकाणी प्रत्येकी १ रुग्ण सापडले या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांनी तातडीने श्रीरामपूर येथील उपविभागीय अधिकारी अनिल पाटील साहेब व मुख्याधिकारी यांना पत्र लिहून पुढील सात दिवसासाठी श्रीरामपूर बंद ठेवावे अशी मागणी करण्यात आली परंतु पूर्ण लॉकडाऊन करणे हा अधिकार जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी यांच्या अधीकारात नसून हा पूर्णपणे अधिकार राज्य शासनाच्या आदेशानुसार शहर बंद करण्याआधी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. स्थानीक प्रशासन संपूर्ण शहर बंद करू शकत नाही. फक्त ज्या ठिकाणी पेशंट सापडला आहे त्या भागातील काही भाग सील करू शकतात याबाबतीत मनसेने अशी मागणी केली आहे की केवळ व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याच्या हेतूने पूर्ण श्रीरामपूर बंद न करता ज्या भागामध्ये रुग्ण सापडले आहे तो भाग पूर्णपणे सील करून घ्यावे अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here