पैठण (प्रतिनिधी) :- शहरात एकाच कुटुंबात सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी तीन दिवसीय जनता कर्फ्यू चे आवाहन केले होते

पैठण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने व प्रशासनाने कुठलेच आदेश नसताना जनतेने जनतेसाठी पुकारलेल्या जनता कर्फ्यूस आज पैठण शहरात मोठा प्रतिसाद मिळाला विशेष म्हणजे शहरातील दारू दुकानेही जनता कर्फ्यूत बंद राहिल्याने कोरोना साखळी तोडण्यासाठी पैठण शहरात राबविलेला जनता कर्फ्यू हा मॉडेल पॅटर्न आता समोर आला आहे

पैठण शहरात एकाच कुटुंबातील सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आल्यानंतर नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी तीन दिवसीय जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी सहकार्य केल्याने पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूस शहरात मोठा प्रतिसाद लाभला दरम्यान शहरात आज पुन्हा एका रुग्णाची वाढ झाल्याने शहरवासीयांची धाकधुक वाढली असून पुकारण्यात आलेल्या तीन दिवशीय जनता कर्फ्यूचे नागरिकांनी समर्थन केले आहे
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एका व्यापाराच्या कुटुंबातील सात सदस्य पॉझिटिव्ह आढळुन आल्याने खळबळ उडाली होती खबरदारीचा उपाय म्हणून नगराध्यक्ष सुरज लोळगे, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी व लोकप्रतिनिधीची बैठक घेऊन शुक्रवार ते रविवार दि २६ ते २८ जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते या आवाहन केले होते या आवाहनास जनतेतून मोठा प्रतीसाद लाभला जनतेने स्वयंप्रेरणेने जनता कर्फ्यूस प्रतिसाद दिल्याने नगराध्यक्ष सुरज लोळगे तहसीलदार चंद्रकांत शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे

आज एका रुग्णांची भर
दरम्यान पैठण शहरात आज आणखी एका रुग्णांची भर पडली असून शहरातील एका खाजगी रुग्णालयातील परिचारकाचा आज पॉझिटिव्ह आला आहे रुग्णालयातील या परीचारकाच्या संपर्कात आलेल्याचे स्वब घेण्यात आले आहे सदर रुग्ण हा शहरातील नारळा भागातील रहिवासी असून दारूसलाम व नारळा या दक्षिण व उत्तर टोकाच्या भागात रुग्ण आढळून आले आहेत नगर परिषदेच्या वतीने हे परिसर निर्जंतुकीकरून सील करण्यात आले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here