श्रीरामपूर(प्रतिनिधी)- शहरातील गाजलेल्या घनकचरा व्यवस्थापन ठेका वाढीव रकमेने १० लाख रुपये जास्त रकमेने जाणारा ठेका २३ लाख ७५ हजार रुपयांमध्ये देणाऱ्या सर्वपक्षीय २३ नगरसेवकांचे भाजपने आभार मानले. कचऱ्यातील खाऊगिरी रोखण्यासाठी भाजपने केलेल्या आवाहनाला सर्व नेत्यांनी साथ दिल्याने जनतेचे कोट्यवधी रुपये वाचल्याची भावना भाजयुमोचे अक्षय वर्पे यांनी व्यक्त केली आहे.
नगरपालिकेने शहरात घनकचरा व्यवस्थापन ठेका देण्यासाठी विशेष सभा आयोजित केली होती. मे.सुधर्म एन्व्हायरमेन्टला हा ठेका २३ लाख ७५ हजार रुपयांमध्ये देण्यात आला. त्यात कर्मचाऱ्यांचा पगार वाढविण्याची नगरसेवकांची रास्त भूमिकाही नगरसेवकांनी घेतली. मागील महिन्यात हाच ठेका मे.सद्गुरू बहूउद्देशीय संस्थेला सदर ठेका ३२ लाख रुपयांना देण्यात यावा म्हणून प्रयत्न केला गेला. मात्र सत्ताधारी गटातील नगरसेविका स्नेहल केतन खोरे, दीपक बाळासाहेब चव्हाण, वैशाली दीपक चव्हाण, जितेंद्र छाजेड, शीतल आबासाहेब गवारे, संतोष कांबळे यांच्यासह उपनगराध्यक्ष करण ससाणे, नगरसेविका भारती कांबळे, भाजप शहराध्यक्ष किरण लुणिया, अंजुम शेख, राजेश अलघ, ताराचंद रणदिवे, जायदाबी कुरेशी, समीना शेख, जयश्री शेळके, संजय फंड, मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, श्रीनिवास बिहाणी, भारती परदेशी, मीरा रोटे, आशा रासकर, मनोज लबडे, यांनी वाढीव रकमेला केलेला कडाडून विरोध केल्याने ठेका देण्याचा काही लोकांचा डाव फसला.
नुकत्याच झालेल्या विशेष सभेत याच नगरसेवकांनी सदर ठेका कमी किमतीत देतानाच कामगार पगार वाढ, चांगले काम न केल्यास गुन्हा दाखल करण्याचा सभागृहाला अधिकार, खत निर्मिती प्रक्रिया रक्कमही २३ लाख रकमेत घेण्यासारखे जनहीताचे निर्णय घेतल्याचे स्वागत भाजप नेते गणेश राठी, तालुकाध्यक्ष सुनील वाणी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष शशिकांत कडूस्कर, माजी शहराध्यक्ष मारुती बिंगले, बाळासाहेब अहिरे, विलास थोरात, युवा मोर्चाचे अक्षय वर्पे, विशाल यादव, रवी पंडित, अक्षय नागरे, आनंद बुधेकर, ओंकार झिरंगे, निलेश जगताप, अमोल आंबिलवादे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here