श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील शेतकऱ्यानं विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

माळवाडगांव/प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील शेतकऱ्यानं विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अशोक तात्याबा आदिक वय ४६ असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे.
शेतकरी अशोक आदिक यांच्या आईच्या नावे अंबिका महीला पतसंस्था तसेच इतर बॅक व हातउसने असे मिळून एकूण १६-१७ लाख रुपयांच्या कर्जाचा बोजा त्यांच्यावर होता.तसेच मागील वर्षी ओल्या दुष्काळमुळे शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, मागील वर्षी गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्याच्या फुगवठ्यामुळे त्यांच्या डाळिंब बागेची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते,डाळिंब बागेचा पिक विमा भरलेला असतांनाही विमा कंपनीकडून देखील नुकसान भरपाई मिळाली नाही. या नुकसानीमुळं शेतकरी अशोक नेहमी तणावात राहत होते. डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर त्यात निसर्गाचा कोप यामुळं त्यांच्या डोक्यावर प्रचंड ताण आला होता. या नैराश्यातून त्यांनी २२ जुन रोजी रात्री ८:३० वाजेदरम्यान आपल्या स्वत:च्या शेतात कीटक नाशक औषध प्राशन केले होते. त्यावर त्यांना तातडीनं श्रीरामपूर येथील साखर कामगार रूग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारा दरम्यान शुक्रवार दि.२६ रोजी पहाटे ४:४६ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत माळवली. त्यानंतर श्रीरामपूर येथे शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.दरम्यान अशोक आदिक यांच्या मृतदेहावर शुक्रवारी दुपारी एक वाजता खानापूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी,आई,एक मुलगा,दोन अविवाहित मुली,सुन असा परिवार आहे.सदर घटनेची माहिती समजल्यानंतर सदर घटनास्थळी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल नवनाथ बर्डे व पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीसात अकस्मात मृत्यू २४/२०२० दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मसुद खान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल नवनाथ बर्डे हे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here